लोहा प्रतिनिधी, डॉ. आर. एम. पुरी व नागेश शिकरे यांच्या प्रयत्नांना यश लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव येथे विहिरीत पडलेल्या भारतीय अजगराची पश...
लोहा प्रतिनिधी, डॉ. आर. एम. पुरी व नागेश शिकरे यांच्या प्रयत्नांना यश
लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव येथे विहिरीत पडलेल्या भारतीय अजगराची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. पुरी व नागेश शिकरे यांनी अतिशय शिताफीने
त्यास पकडले व सुरक्षित ठिकाणी नेऊन त्याची सुटका केली करून त्याला नैसर्गिक अधिवास मिळाला
रिसनगाव येथील पशुपालक . बालाजी नागोराव हाबगुंडे यांच्या विहिरीमध्ये अजगर पडल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी कार्य तत्पर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आर. एम. पुरी यांना कळविले .निष्णात सर्पमित्र असलेले
डॉ. आर. एम. पुरी व सर्पमित्र . नागेश शिकरे यांनी प्रयत्न करून अजगराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले.
या बचावकार्यात . नूर अली, कैलास हाबगुंडे, . अजय झाडे, . संतोष वडजे तसेच रिसनगाव येथील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
वन्यजीव हे पर्यावरणाचा अविभाज्य भाग असून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विहिरीत किंवा अन्य ठिकाणी वन्यजीव अडकल्याचे आढळल्यास त्यांना स्वतः हाताळण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित बचाव पथकाची मदत घ्यावी, असे आवाहन डॉ एम आर पुरी यांनी केले आहे.
अजगर आहे असे म्हटल्या नंतर शेतकरी व आजूबाजूचे घाबरले होते पण डॉ एम आर पुरी व टीममुळे त्यास जीवदान ।मिळाले आहे यांनीनिमित्ताने वन्यजीव संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

COMMENTS