सेलू(। ) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व परभणी योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू वतीने जिल्हास्तरीय शालेय ग्रामीण गट योगासन क्रीडा स्पर्धा दिनांक 7 ऑक्टोबर रोजी नूतन योगा हॉल सेलू येथे यशस्वी संपन्न झाल्या.
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक के. के देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. भारतीय प्राचीन योगशास्त्र हे आदर्श जीवन जगण्यासाठी भारताने संपूर्ण जगाला दिले. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे मूल्य शिक्षण, आरोग्य शिक्षण, एकाग्रता, आत्मविश्वास, आदर्श दिनचर्या या गोष्टी योगशास्त्रात आहेत.
याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक गणेश माळवे, सुमेध शिंदे, योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव देविदास सोन्नेकर, प्रशांत घिके आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वासुदेव योग सेंटरच्या योगपटूंनी उत्कृष्ट योगासन सादरीकरण केले. या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा वयोगट 14, 17, आणि 19 मुला मुलींच्या ट्रॅडिशनल इंडिव्हिज्युअल, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेयर या योगासन प्रकारात घेण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून माधव देशपांडे, सोमनाथ महाजन, शिल्पा पिंपळे, प्रशांत घिके, श्रुती खंदारे, शितल खंदारे यांनी काम केले.

COMMENTS