परभणी(। ) भारतीय आट्या पाट्या महासंघ व आंन्धप्रदेश आट्या पाट्या असोसिएशन वतीने २६ वी। सबज्युनियर आट्या पाट्या क्रीडा स्पर्धा
दि. १ ते ४ ऑक्टो दरम्यान हैद्राबाद येथे लालबहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये पार पडलेल्या. या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य मुले मुली च्या दोन्ही संघांने सुवर्ण पदक विजेता ठरल्या.
नूतन विद्यालय सेलू येथील चि. श्रेयस सुंदर मस्के यांनी महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करत सुवर्ण पदक विजेता ठरला.
चि. श्रेयस मस्के, रायबा भोसले, कु. प्रतिभा भालशंकर, हर्षदा मोगल , यांनी सेलू येथील राज्य आट्या पाट्या क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले होते.
या उज्वल यशाबदल नूतन संस्था अध्यक्ष डॉ सत्यनारायण लोया, सचिव डॉ. व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी,
राज्य संघटना सचिव अमर चकोले व फेडरेशन महासचिव डॉ. दीपक कवीश्वर सर , जिल्हा सचिव मधुकर क्षीरसागर , मुख्याध्यापक किरण देशपांडे, सौ.एन.डी. पाटिल, गणेश माळवे, प्रंशात नाईक, किशोर ढोके अभिनंदन केले.

COMMENTS