*नांदेड :*(दि. ५ ऑक्टोबर २०२६)
तेलंगणा राज्यातील वारंगल येथील काकतिया विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील पदव्युत्तर प्राणिशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर यशवंत महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय शामराव नंनवरे यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
डॉ. संजय नंनवरे गेल्या ३० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून २४ वर्षे संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या संशोधनकार्याची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून ३१५ संशोधनपर शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच प्राणिशास्त्र विषयावरील चार पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी आतापर्यंत १४० परिषदांमध्ये सहभाग नोंदविला असून, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या संशोधनकार्याचे सादरीकरण केले आहे.
डॉ. संजय नंनवरे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड; गुलबर्गा विद्यापीठ, कलबुर्गी; तसेच प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथील प्राणिशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना २३ विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
काकतिया विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र अभ्यास मंडळावर झालेल्या निवडीबद्दल माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ.एच.एस.जगताप, डॉ. धनराज भुरे, डॉ.सुनीता गुप्ता, डॉ. एच. एल. तमलुरकर, डॉ. बी. बालाजी राव, डॉ.एम.एस.कदम, डॉ. नीताराणी जैस्वाल, प्रा. नारायण गव्हाणे, प्रा. साहेबराव माने, डॉ.दीप्ती तोटावार, डॉ.रोहिणी चव्हाण,डॉ. शिवराज बोकडे, डॉ. नीरज पांडे, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील आणि जगन्नाथ महामुने यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS