नांदेड मधून शुभेच्छाचा वर्षाव
दिल्ली/मुंबई/नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक कार्यात महत्त्वाची जबाबदारी सोपवत, नवनीत सिंघ गांधी यांची महाराष्ट्र राज्य शीख समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार श्री. इम्रान प्रतापगढीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शीख समाजाशी संवाद व समन्वय साधणे, समाजातील विविध प्रश्न व अपेक्षा पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचविणे तसेच पक्ष आणि शीख समाजामधील समन्वय अधिक दृढ करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी नवनीत सिंघ गांधी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल नवनीत सिंघ गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष श्री. इम्रान प्रतापगढीजी, उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रभारी श्री.अहमद खानजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व अकोला मतदारसंघाचे आमदार श्री.साजिद पठाणजी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळजी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत, महाराष्ट्रातील शीख समाजाच्या हितासाठी तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार नवनीत सिंघ गांधी यांनी व्यक्त केला.या निवडीमुळे नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते कॉ.गंगाधर गायकवाड,डॉ.अब्दुल बाकी,कॉ. जयराज गायकवाड, कॉ. श्याम सरोदे,कॉ.मंगेश वट्टेवाड आदींनी अभिनंदन करीत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
-कॉ.गंगाधर गायकवाड,
जनरल सेक्रेटरी CITU नांदेड जिल्हा कमिटी.
मो. 7709217188
दि. 1 ऑक्टोबर 2026

COMMENTS