हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; ३ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढून अर्जांची यादी सादर करणार - कॉ.नसीमा शेख नांदेड : मुख्यमंत्री माझी ला...
हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; ३ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढून अर्जांची यादी सादर करणार - कॉ.नसीमा शेख
नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे वगळण्यात आलेल्या पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या (जमसं) वतीने गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे म. फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथून महिला व बाल विकास कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जनवादी महिला संघटनेच्या वतीने वगळण्यात आलेल्या महिलांचे अर्ज भरून घेण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले असून, आजच्या मोर्चादरम्यान अर्जदार महिलांची यादी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली.
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांना केवायसी, कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक अडचणी तसेच इतर कारणांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पात्र असूनही योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना तातडीने न्याय देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चाला मार्गदर्शन करताना जमसं राज्य सचिव मंडळ सदस्या प्रा. सुनंदाताई तिडके (जालना) यांनी शासनाने महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. वगळलेल्या पात्र महिलांना पुन्हा संधी देऊन त्यांचे अर्ज स्वीकारावेत आणि प्रलंबित लाभ तातडीने देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्याध्यक्षा कॉ. नसीमा शेख म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांनी निराश होण्याचे कारण नाही. जनवादी महिला संघटना त्यांच्या हक्कासाठी ठामपणे लढत आहे. राज्यभर वगळण्यात आलेल्या महिलांचे अर्ज भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील महिलांचे अर्ज व यादी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ३ नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर होणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे,” तोपर्यंत जिल्ह्यातील वगळलेल्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरणे सुरु राहील असे आवाहन त्यांनी केले.
३ नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर जनवादी महिला संघटनेच्या वतीने राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार असून, नांदेड जिल्ह्यातील वगळलेल्या लाडक्या बहिणींचे भरलेले अर्ज व यादी शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व जमसं नांदेड जिल्हाध्यक्षा तथा राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. लता गायकवाड, कार्याध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, जिल्हा सचिव कॉ. सुनीता बोनगीर, उपाध्यक्षा कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. मीना आरसे, कॉ. संगीता गाभने, कॉ. मेघाताई गऊळकर आदींनी केले.
मोर्चाला सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, जातीअंत संघर्ष समितीचे सहनिमंत्रक डॉ. आदिनाथ इंगोले, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. दिगंबर काळे, कॉ. राहुल नरवाडे आदींनी पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित महिला नेत्यांनी शासनाच्या महिला धोरणावर तसेच लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या पात्र महिलांच्या प्रश्नांवर जोरदार भाषणे केली.\ पात्र महिलांना लाभ मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार” असा निर्धार यावेळी करण्यात आला.

COMMENTS