मराठी भाषेचा इतिहास अडीच हजार वर्षे जुना असून मराठीचे संवर्धन करण्यात गाथासप्तशती, महात्मा चक्रधर, संत मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ...
मराठी भाषेचा इतिहास अडीच हजार वर्षे जुना असून मराठीचे संवर्धन करण्यात गाथासप्तशती, महात्मा चक्रधर, संत मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, वि. रा. शिंदे, बहिणाबाई चौधरी अशा महानुभावांचे योगदान राहिले आहे. अभिजात मराठी भाषेविषयीची अस्मिता जपण्याचे आणि तिचे अस्तित्व तेवत ठेवण्याची जबाबदारी समाजाची आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अभिमान मराठी अभिजात मराठी' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून श्रीकांत देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला. 'अभिजात मराठी, अभिमान मराठी' या सांस्कृतिक कार्यक्रमासोबत 'शब्दांची जुलगबंदी' स्पर्धा, निमंत्रितांचे कवी संमेलन आणि कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी कलावंतांचे कौतुक केले. विविध गीते व नृत्ये यांच्या बहारदार सादरीकरणातून मराठी भाषेची पालखी कलावंत घेऊन आले आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी राजेश सोळंके, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजेश शिंदे, अधिष्ठाता डॉ. पराग खडके, दिनेश गायकवाड, राजू कदम, नंदकिशोर जुवेकर, भाषा संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपाल चिखलीकर, डॉ. रुपाली जैन, डॉ. अशोक कदम यांची उपस्थिती होती. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
‘अभिजात मराठी अभिमान मराठी' या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसेनजीत कोसंबी, अभिजित कोसंबी, सुभाष नकाशे, दिगंबर नाईक यांच्या कलासंचाने महाराष्ट्राच्या लोकपरंपरा व अभिजात मराठीचे सादरीकरण करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कवी संमेलनात व्यंकटेश चौधरी, बापू दासरी, माधव चुकेवाड, विनायक येवले, यांनी आणि विद्यार्थ्यांनी कविता सादर करून उपस्थितांच्या काळजाला हात घातला. कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी महेश मोरे होते. याशिवाय कथाकार राम तरटे आणि बबन शिंदे यांनी स्थानिक बोलीभाषेचा बाज आणि साज असलेल्या कथा सादर केल्या.

COMMENTS