स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यापीठांतर्गत विभाग मानांकन (UDRF) पुरस्कार जाहीर केले आहेत. या मान...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यापीठांतर्गत विभाग मानांकन (UDRF) पुरस्कार जाहीर केले आहेत. या मानांकनात गणितीयशास्त्रे संकुलाने ४७६.८८ गुणांसह सर्वोत्कृष्ट संकुलाचा पुरस्कार पटकावला.
विद्यापीठांतर्गत विभाग मानांकन (UDRF) मूल्यांकनामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी, विद्यार्थी प्रगती, प्रशासन, व्यावसायिक उपक्रम तसेच परिषद व सहयोग आदी विविध निकषांचा समावेश करण्यात आला.
जैवतंत्रशास्त्र संकुलाला सर्वोत्कृष्ट विज्ञान संकुल, वाणिज्य व व्य्वासाथापनशास्त्र संकुलाला सर्वोत्कृष्ट बिगर-विज्ञान संकुल, तर लातूर उपकेंद्रातील तंत्रज्ञान संकुलाला सर्वोत्कृष्ट उपकेंद्र संकुलाचा पुरस्कार मिळाला. तसेच औषधनिर्माणशास्त्र संकुल, भूशास्त्र संकुल आणि भौतिकशास्त्र संकुल यांनीही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळविले.
या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांच्यासह अधिष्ठाता व विद्यापीठ प्रशासनाने सर्व विजेत्या संकुलांचे अभिनंदन केले. युडीआरएफ मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल आयक्यूएसीचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांच्या प्रयत्नांचेही कुलगुरूंनी कौतुक केले. पुरस्कार आगामी पुरस्कार समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत.

COMMENTS