नांदेड:( दि. ६ ऑक्टोबर २०२६)
यशवंत महाविद्यालयात सेल्फ ग्रुपिंग आणि मेकओव्हर या ॲड ऑन कोर्सच्या माध्यमातून ब्युटी पार्लर ट्रेनिंगचा उद्घाटन सोहळा माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार उत्साहात संपन्न झाला.
या प्रशिक्षण कोर्सच्या उद्घाटक सौंदर्यतज्ञ हर्षदा यशवंत सूर्यवंशी होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले.
प्रारंभी प्रास्ताविक प्रा. राजश्री भोपाळे यांनी केले .
हर्षदा सूर्यवंशी यांनी उद्घाटन प्रसंगी, महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सेल्फ ग्रुमिंग विषयी मार्गदर्शन केले तसेच हेअर स्टाईलचे प्रात्यक्षिक दाखविले. त्याचबरोबर साडी परिधान करण्याची शैली कशी असते, हे दर्शविले.
सूत्रसंचालन प्रा. सोनाली वाकोडे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप राज्यशास्त्राच्या अभ्यासिका व सुप्रसिद्ध वक्ते डॉ. कविता सोनकांबळे यांनी केला.
याप्रसंगी डॉ.मीरा फड यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी यांची भरभरून उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

COMMENTS