स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणी साठी 9 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

-  महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन नांदेडातही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार लेकराबाळासह मोर्चा ना...


- 

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन नांदेडातही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार लेकराबाळासह मोर्चा
नांदेड : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सोलापूर येथील बैठकीत ठरल्याप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 9 ऑक्टोबर रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्याचा निर्णय झाला आहे. त्याच धर्तीवर काल नांदेड येथे विसावा उद्यान मधील वृत्तपत्र वितरण सेंटरवर राज्याचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व चंद्रकांत घाटोळ यांच्या उपस्थितीत गेटमिटींग घेण्यात आली.
नांदेड येथे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून लेकरा बाळा सह लोकशाही व शांततेच्या मार्गाने मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यासाठी सर्व तयारी झाली आहे. पोलिस अधीक्षक, पोलीस निरीक्षक वजीराबाद व वाहतूक निरीक्षक यांना पत्र देण्यात आले आहे. अशी माहिती यावेळी बोलतांना बालाजी पवार यांनी दिली.
या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासह वृत्तपत्र व्यवसायात कार्यरत असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यातची मागणी आहे. यासाठी छपाई माध्यमातील व वेगवेगळ्या मिडीयातील सर्वांनी मोर्चामध्ये सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर जन्मल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर केले जाणार आहे.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्टोंबर 10 ऑक्टोबर 2024 मध्ये जाहीर केलेल्या स्वतंत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची तात्काळ अंमलबजावणी करावी, महामंडळाच्या योजना चालवण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद करावी, विक्रेत्यांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा आणि निवृत्ती वेतन योजना त्वरित सुरू कराव्यात, राज्यातील सर्व अधिकृत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी यासह महामंडळाच्या माध्यमातून वृध्द वृत्तपत्र विक्रेत्यांना निवृत्ती वेतन लागु करावे, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्याकरीता राखीव कोटा ठेवावा, वृत्तपत्र विक्रेत्याला 75 टक्के किंवा अधिक कायमचे अपंगत्व आल्यास आर्थिक साहाय्य मिळावे, वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री वृत्तपत्र विक्रेत्यास विधुर पतीस आर्थिक साहाय्य, वृत्तपत्र विक्रेत्याचा वृत्तपत्र वाटपाचे कामावर असतांना मृत्यु झाल्यास वारसास आर्थिक साहाय्य मिळावे, वृत्तपत्र विक्रेत्याच्या गंभीर आजाराच्या उपचारार्थ अर्थ साहाय्य मिळावे, मोक्याचे ठिकाणी पेपर स्टॉल करिता जागा आरक्षीत करुन द्यावी व अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात गृहीत धरु नये, रस्ते रुंदीकरण व विकासाचे योजनेअंतर्गत स्टॉल हलविण्यापुर्वी वृत्तपत्र विक्री व्यवसायाकरीता साईची पर्यायी जागा द्यावी, वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलांच्या शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी आदी मागण्यांसाठी हे मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी गणेश वडगावकर, बाबु जल्देवार, निळकंठ सोनटक्के, संजय गोणे, सत्यनारायण देवरकोंडा, बालाजी चंदेल, सरदारसिंह सुर्यवंशी,संदिप कटकमवार, गणेश जुजाराव,नरेश वंगलवार, भागवत गायकवाड,अश़ोक खुणे, अवधूत पसलवाड, दुर्गा प्रसाद बलगुरी प्रवीण कुलकर्णी, शशिकांत दामोधर, साईनाथ हंगरगे, संजय बेरूळकर ,अनुप ठाकुर, अशोक झोळगे, शंकर लच्चेवार‌, विठ्ठल फडेवार, राजेश पवार, तुकाराम हंबर्डे, दत्तात्रय मामडे, इस्माईल पिंजारी, सुदर्शन कऱ्हाळे, सुनील व्यवहारे, बापुराव बडुरे, देवबा डोरले, मनोज चव्हाण, केदार ताटेवाड, अनिल जाधव, गणेश जयस्वाल, अनंत संगेवार, हबीब उबेद, पंकज राहेगावकर, प्रकाश भरकडे, प्रशांत वाघमारे, राजेश ठाकुर, ऋषिकेश लच्चेवार, सुनील सावंत,राजु सरपाते, गंगाधर सदावर्ते, विजय कठारे,संतोष कानगुले, अविनाश बोंगुलवार,सुरेश आंधे, विनायक आंधे आदी सदस्यांसह मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्रेते बांधव उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group