उमरी नरेंद्र येरावार कर्जबाजारीपणाला कंटाळून हंगिरगा (ता. उमरी) येथील शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळव...
उमरी नरेंद्र येरावार
कर्जबाजारीपणाला कंटाळून हंगिरगा (ता. उमरी) येथील शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.
राजू दिगांबर वहिंदे, वय 40 रा. हंगिरगा, ता. उमरी, जि. नांदेड. असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू वहिंदे नापिकीमुळे ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
मंगळवारी सकाळी वडीलांच्या शेतशिवारात ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गेल्या दोन तीन दिवसापूर्वी गळफास घेतली असावी असे बाबुराव वहिंदे यांनी सांगितले. मृत्यूचे कारण माञ अद्याप समजले नाही. दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS