नरेंद्र येरावार उमरी..... मराठवाड्यात प्रथमच शिर्डी संस्थानातील सदगुरू साईनाथ महाराज यांच्या चरण पादुका उमरी व गोरठ्यातील संत कवी दासगणू ...
नरेंद्र येरावार
उमरी.....
मराठवाड्यात प्रथमच शिर्डी संस्थानातील सदगुरू साईनाथ महाराज यांच्या चरण पादुका उमरी व गोरठ्यातील संत कवी दासगणू महाराज प्रतिष्ठानात येणार असून स्वागत व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
येत्या बुधवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी चरणपादुकाचे सकाळी उमरी शहरात भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असून उमरी शहराच्या मध्यवर्ती रस्त्याने पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल व त्यानंतर श्रीक्षेत्र गोरठा येथील संत कवी दासगणू महाराज प्रतिष्ठानात सकाळी दहापासून सायंकाळपर्यंत साई
चरणपादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या भव्य दिव्य सोहळ्यानिमित्त उमरी आणि गोरठा नगरी सजली आहे. यासाठी श्रीसंत दासगणू महाराज साईभक्त मंडळ, उमरी व गोरठा येथील समस्त साईभक्त जोरदार प्रयत्न करीत आहेत......
......

COMMENTS