मुखेड (विठ्ठल कल्यापाड) मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील चि. मंथन संतोष देशटवार ह्याने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून महाराष्ट्रातील ...
मुखेड (विठ्ठल कल्यापाड)
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील चि. मंथन संतोष देशटवार ह्याने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून महाराष्ट्रातील नामांकित असलेले शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सातारा जीएमसी मध्ये (एम.बी.बी.एस ) प्रवेशासाठी पात्र झाला आहे, चि. मंथन हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ गुरुजी देशटवार यांचा नातू व चि. डॉ. मंथन चे वडील श्री संतोष नागनाथ देशटवार जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक पदावर व आई कृषी विभागात
सहाय्यक कृषि अधिकारी पदावर कार्यरत आहेत. चि.
मंथनच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS