सेलू : सेलू तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक (मराठी) शाळेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दहीहंडी कार्यक्रम शनिवारी, पाच सप...
सेलू : सेलू तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक (मराठी) शाळेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दहीहंडी कार्यक्रम शनिवारी, पाच सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
मुख्याध्यापक गोविंद चाटे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अयोध्या रोकडे, तुळशीराम ढवळे, माणिकराव गीनगिने, विष्णू राख यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षक किरण गिल्डा, रामेश्वर गिते, स्वाती हेलसकर, लिना ढवळे यांच्या पुढाकाराने पहिली ते पाचवीच्या मुला-मुलांनी बाल राधा व कन्हैयांच्या वेशभूषा साकारत उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी शिक्षक दिनानिमित्त अंगणवाडीताई अनिता स्वामी, यमुना कांदे, सुमन बुधवंत, साजेदा शेख, सुमन आष्टकर, संजीवनी खेरडकर यांच्यासह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सेलू तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक (मराठी) शाळेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दहीहंडी कार्यक्रम शनिवारी उत्साहात पार पडला.
***

COMMENTS