सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण; स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान किनवट : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन...
सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण; स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मानकिनवट : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १७) किनवट शहर व तालुक्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी बी. सरवनन, भाप्रसे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर स्वरनिनाद संगीत क्लास, गोकुंदाच्या संस्थापिका संगीत विशारद आम्रपाली वाठोरे-कांबळे यांनी तबला विशारद प्रा. शिवकुमार कोंडे यांच्या तबला साथीने राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत व मराठवाडा गीत सादर केले.
यावेळी पोलिस दलाच्या वतीने मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदी कर्मयोगी उत्तम कानिंदे यांनी केले, तर राम बुसमवार यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या वारसांचा यावेळी सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदार मुक्ताबाई निवृत्ती सावते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, नायब तहसीलदार मोहम्मद रफिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, तर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गटशिक्षणाधिकारी निळकंठ चेटले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
किनवट : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नगरपरिषद प्रांगणात ध्वजवंदन करताना नगराध्यक्षा सौ. सुजाता ऐंड्रलवार. यावेळी मुख्याधिकारी रोहित भागरे, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS