अवनी करंदीकर लिखित ’द हिडन पॉवर ऑफ मॅरिड वूमन’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन; अॅमेझॉनवर ठरले ’नंबर 1 बेस्टसेलर’
नांदेड, दि. २४ (प्रतिनिधी):
इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ऑथर्सतर्फे गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्यात, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांची कन्या सौ. अवनी अथर्व करंदीकर (देवयानी तांबेकर) यांच्या ’द हिडन पॉवर ऑफ मॅरिड वूमन’ या पुस्तकाचे थाटात प्रकाशन पार पडले। अल्पावधीतच हे पुस्तक अॅमेझॉन या जागतिक डिजिटल व्यासपीठावर ’नंबर 1 बेस्टसेलर’ ठरल्याने त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे।
गोव्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या प्रसिद्ध ’हॉटेल रेनेसां’ येथे ’इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ऑथर्स’ (ICA) च्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। देशभरातील नामांकित लेखक, विचारवंत आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। 'ICA' चे संस्थापक मि. इन्स्पायरिंग जतिन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले।
या प्रसंगी अवनी करंदीकर यांनी संपादित केलेल्या ’अँथॉलॉजी चॅप्टर’मधील त्यांच्या अद्वितीय व मौलिक साहित्यातील योगदानाची दखल घेत, त्यांना विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या सोहळ्याला अवनी यांचे वडील धनंजय तांबेकर व आई सौ. सुषमा तांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती।
प्रकाशन होताच अॅमेझॉनवर यशाची मोहोर │ ’कष्टाचे चीज होणे’ या उक्तीचा प्रत्यय या पुस्तकाच्या बाबतीत आला आहे। प्रकाशनानंतर अवघ्या काही तासांतच या पुस्तकाने ’अॅमेझॉन’वर ’नंबर 1 बेस्टसेलर’चा किताब पटकावला। विवाहित स्त्रियांची सुप्त शक्ती, त्यांची │कौटुंबिक व सामाजिक समीकरणांमधील भूमिका आणि आत्मशोधाचा प्रवास यांवर अवनी करंदीकर यांनी अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे। वाचकवर्गाकडून या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळत आहे समकालीन स्त्री-साहित्यातील प्रवाह आणि संदर्भ डिजिटल युगात भारतीय महिला लेखिका जागतिक पटलावर स्वकर्तृत्वान आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत। मराठी साहित्याच्या│ वैचारिक व सामाजिक परंपरेला पुढे नेत, आधुनिक काळातील
कौटुंबिक आव्हाने आणि स्त्री-शक्तीचा जागर इंग्रजी भाषेत मांडण्याचे महत्त्वाचे कार्य अवनी करंदीकर यांनी केले आहे।ई-बुक्स आणि डिजिटल प्रकाशनाच्या माध्यमातून जागतिकवाचकांपर्यंत पोहोचणे सुलभ झाले असून, अवनी यांच्या या यशामुळे भारतीय इंग्रजी लेखनाला एक नवा आयाम मिळाला आहे।
नांदेड: गोवा येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अवनी करंदीकर लिखित ’द हिडन पॉवर ऑफ मॅरिड वूमन’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन करताना मि. इन्स्पायरिंग जतिन, सोबत लेखिका अवनी करंदीकर, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर आणि सौ. सुषमा तांबेकर।

COMMENTS