* भाजप शहराध्यक्ष गोपू महामुने यांच्या सदिच्छा भेटीने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी) सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर शहरात सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांनी शहरातील सार्वजनिक सर्व गणेश मंडळांना सदिच्छा भेट दिली.
या दरम्यान त्यांनी माहूर शहरातील लहान-मोठ्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले व आरती केली.
माहूर शहरातील सार्वजनिक सर्व प्रमुख मंडळासह गल्लीबोळांतील गणेश मंडळांच्या मंडपात गोपू महामुने यांनी सपत्नीक हजेरी लावली. प्रत्येक ठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. महामुने यांनी श्री गणेशाची महाआरती करून माहूर शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. आरतीनंतर त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्सवाच्या नियोजनाबाबत विचारपूस केली व त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.महामुने यांच्या या भेटीमुळे गणेशोत्सवाच्या आनंदात द्विगुणित भर पडल्याची भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
माहूर शहरात गोपू महामुने यांचा दांडगा जनसंपर्क आणि मोठा चाहता वर्ग आहे. सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद आणि मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे तरुण वर्गात गोपू भाऊ ची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

COMMENTS