नांदेड / प्रतिनिधी -शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी बाबूराव गणपत साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे मरा...
नांदेड / प्रतिनिधी -शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी बाबूराव गणपत साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष व कार्याध्यक्ष सुभाष शंकरराव गायकवाड यांनी २१ जून २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी सोपविली आहे.
शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या माध्यमातून झोपडपट्टी व वंचित घटकांच्या प्रश्नांवर काम करण्याची जबाबदारी साळवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्यासोबतच संघटनात्मक पातळीवर सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचे आवाहन नियुक्तीपत्रातून करण्यात आले आहे.
साळवे यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, नांदेड जिल्ह्यात झोपडपट्टी व वंचित घटकांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी ते पुढाकार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS