डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळावर गुन्हे दाखल 1 कोटी 37 लाख रुपयांचे डीजे सह वाहन जप्त

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे लखमापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत तब्बल 5 डीजे कर्णकरकश ...

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे लखमापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत तब्बल 5 डीजे कर्णकरकश आवाजात वाजविल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी डीजे वाजविणारे वाहन आणि गणेश मंडळा सह इतर नागरिकावर माहूर पोलीस ठाण्यात दि 24 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले असून डीजे सह चार वाहन असा एकूण 1 कोटी 37 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे
लखमापूर बीटचे पोहेका संदीप पुंडलिकराव गोपनवाड यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याप्रमाने दिं 24/09/2026 रोजी लखमापुर बीट मधील लांजी, शेकापुर, लखमापुर इत्यादी गावामध्ये श्री गणेश मुर्तीचे र्विसजण असल्याने स्कीम प्रमाणे बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामध्ये माझी ड्युटी शेकापुर गणपती र्विसजन कामी ड्युटी लावण्यात आली होती. शेकापुर येथील गणेश र्विसजण झाल्या नंतर मी माझ्या बीट मधील मौजे लखमापुर येथे बंदोबस्त गेलो. बंदोबस्त स्कीममध्ये लखमापुर येथील गणपती र्विसजन बंदोबस्त कामी पोहेकाँ चौधरी पोकाँ जाधव पोकाँ सोनसळे चव्हाण शिंदे वर्मा वानखेडे राठोड भगत चांदेकर चव्हाण अंमलदार लावण्यात आले होते मौजे लखमापुर तांडा येथील मिरवणुकी मध्ये 02 परवाना धारक व 03 विनापरवाना धारक असे एकुण 05 गणेश मंडळ सहभागी झालेले होते. त्यातील परवाना धारक महाराणी गणेश मंडळ लखमापुर अध्यक्ष आदर्श वसंत राठोड उपाध्यक्ष कपिल मानिक पवार सचिव प्रदुम्न पांडुरंग जाधव न्यानेश्वर गजानन राठोड रुपेश देविसिंग राठोड तसेच परवाना धारक साई श्रध्दा गणेश मंडळ अध्यक्ष हिरामण कुंदन जाधव सचिव राम चव्हाण सदस्य गजानन चैनसिंग चव्हाण रितेश चव्हाण राहुल पवार यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन प्रतिंबधीत असलेली डॉल्बी सिस्टीम वाजवण्यास बंदी असतांना देखील गणपती विसजन मिरवणुकी मध्ये डॉल्बी सिस्टीम लावुन लोकांच्या जिवीतास व आरोग्यास धोका निमाण होईल असा मोठा कर्कश आवाजात मिरवणुक काढली व पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिलेल्या लेखी व आम्ही दिलेल्या तोंडी आदेशाकडे दुर्लक्ष करुन र्विसजण मिरवणुक वेळेत न संपवता विनाकारण रेंगाळत ठेवली.
मिरवणुकी मधील गराशा गणेश मंडळाचे अध्यक्ष दिनेश राठोड उपाध्यक्ष नयन जाधव कोषाध्यक्ष अरंविंद पवार सचिव गोपाल जाधव सदस्य विक्की राठोड सदस्य आकाश जाधव भाया गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रभास जाधव उपाध्यक्ष आनंद राठोड कोषाध्यक्ष विकास राठोड सचिव प्रविण जाधव कन्हैया गणेश मंडळाचे अध्यक्ष रुपेश विजय जाधव उपाध्यक्ष अरविंद राठोड सचिव रवि जाधव कोषाध्यक्ष कैलास जाधव सदस्य विशाल जाधव यांनी गणेश मुर्ती स्थापन करण्याची परवानगी नसतांनाही श्री गणेश मुर्तीचे स्थापना केली तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करून लोकांचा मोठ्या प्रमाणात जमाव जमवुन गणपती र्विसजन मिरवणुक काढली. तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने मिरवणुक संपल्यानंतर महाराणी गणेश मंडळ, लखमापुर यांनी लावलेल्या डॉल्बी सिस्टीमसह वाहन क्र MH 04 HD 4841 आयचर, साई श्रध्दा गणेश मंडळ यांनी लावलेल्या डॉल्बी सिस्टीमसह वाहन क्र MH 04 EY 5147 आयचर भाया गणेश मंडळ यांनी लावलेल्या डॉल्बी सिस्टीमसह वाहन क्र MH 12 MV 2631 आयचर, कन्हैया गणेश मंडळ कन्हैया गणेश मंडळ यांनी लावलेल्या डॉल्बी सिस्टीमसह वाहन क्र MH 14 LX 2572 आयचर असे ताब्यात घेवुन पोस्टे ला आणुन लावण्यात आले आहेत व श्री गराशा गणेश मंडळ यांनी लावलेल्या डॉल्बी सिस्टीमसह वाहन क्र MH 04 EL 5875 टेम्पो हे मिरवणुकी मधुन पळुन गेले आहे.
ताब्यात घेतलेल्या डॉल्बी सिस्टीम व वाहनाचे वर्णन खालील प्रमाणे 32,00,000 आयचर वाहन क्र MH 12 MV 2631 व डॉल्बी सिस्टीम जु. वा. किं 34,00,000 - आयचर वाहन क्र MH 04 HD 4841 व डॉल्बी सिस्टीम जु.वा. किं 35,00,000 आयचर वाहन क्र MH 04 EY 5147 व डॉल्बी सिस्टीम जु.वा.किं अं.
36,00,000 आयचर वाहन क्र MH 14 LX 2572 व डॉल्बी सिस्टीम जु.वा. किं अं.
एकुण 1,37,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून इतर सहकार्य करणाऱ्या नागरिकावर पोहेका गोपनवाड यांनी फिर्याद दिल्याने पोहेका पुष्पा पुसनाके यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके यांचे सह पोलीस करत आहेत

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group