नांदेड, १९ : येथील बाबानगर परिसरातील महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थी संसद २०२६-२७ ची निवडणूक लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी आनंद सेवकर तर सचिवपदी राजकन्या रुंजे यांची निवड झाली.
मुख्याध्यापिका एस. आर. कदम, पर्यवेक्षक डी. एल. खानझोडे, एस. व्ही. जाधव, सांस्कृतिक प्रमुख डॉ. राम वाघमारे, क्रीडा प्रमुख एस. एन. स्वामी, समन्वयक पी. एस. केंद्रे, साहेबराव मावले व गंगाधर जाधव यांच्या उपस्थितीत विद्यार्थी संसदेची निवड प्रक्रिया पार पडली.
विद्यार्थी संसदेच्या उपाध्यक्षपदी रुद्र पाठक व तेजस्वी राठोड, सहसचिवपदी किरण शेंडगे व साई गायकवाड, कोषाध्यक्षपदी संचिता अष्टेकर यांची निवड झाली. सांस्कृतिक विभागासाठी ईश्वरी राजेगोरे व आर्यन गंजेवार, क्रीडा विभागासाठी रणवीर केंद्रे व दुर्गेश संतवाले यांची निवड करण्यात आली. संसद सदस्य म्हणून रुद्र खूपसे, गौरी कपाळे, अर्णव क्षीरसागर, जागृती कुरुडे, स्वरा देशमुख, साक्षी नेव्हल आणि ईश्वरी जाधव यांची निवड झाली.
निवड झालेल्या विद्यार्थी संसद पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाळेतील विविध उपक्रमांचे नियोजन व आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थी संसदेमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. नवनिर्वाचित विद्यार्थी संसद पदाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS