नांदेड संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था आणि युनायटेड पद्मशाली संगम (नांदेड) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ सप्टेंबर २०२६ रोजी 'ग्लोबल इंटर...
नांदेड संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था आणि युनायटेड पद्मशाली संगम (नांदेड) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ सप्टेंबर २०२६ रोजी 'ग्लोबल इंटरनेशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज' येथे एका भव्य 'मेगा हेल्थ चेकअप कॅम्प'चे (मोफत आरोग्य तपासणी शिबिर) यशस्वी आयोजन करण्यात आले. संस्थेच्या संस्थापिका तथा युनायटेड पद्मशाली संगमच्या जिल्हा महिला अध्यक्षा प्रगती बालाजी निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.५०० विद्यार्थ्यांची दात, डोळे आणि बालरोग तपासणी
या शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे शाळेतील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुलांच्या दातांची सखोल तपासणी करून त्यांना तोंडाच्या स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात आले. दातांची स्वच्छता आणि योग्य काळजी घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला टूथब्रशचे वाटप करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ आणि नेत्रतज्ज्ञांनी सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व दृष्टीची तपासणी करून त्यांना आवश्यक सल्ला दिला.
हा सामाजिक व आरोग्य सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संचालिका वैशाली मारकोले पाटील आणि अश्विनी पांचाळ यांनी विशेष भूमिका बजावली. तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले. विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली आणि स्वच्छतेचा संदेश देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS