नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे पालक मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक...
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे पालक मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार नौनिहाल सिंग जागीरदार हे होते. प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक प्रशांत चौधरी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योजना बच्चेवार यांनी केले. सूत्रसंचालन व्यंकटराव चिलवरवार यांनी केले, तर आभार विनोद टेकाळे यांनी मानले.यावेळी मार्गदर्शन करताना स नौनिहालसिंग जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त, उपस्थिती, अभ्यासातील अडचणी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालकांनी एकत्रितपणे संवाद व चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. पालक व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद राहावा, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात आणि शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा व्हावी, यासाठी पालक-शिक्षक संघ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS