नांदेड प्रतिनिधी: कंधार तालुक्यातील बाचोटी या गावात एक शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहे पण या कुटुंबात विठ्ठल बालाजी पाडोरणे यांना दोन मुले दिगंबर व दत्ता असून त्यांना मुलगी नसल्यामुळे त्यांचा छोटा मुलगा दत्ता पाडोरणे यांनी आपल्या वडिलांना स्वतः हाताला राखी बांधून ओवाळणी करुन राखी पौर्णिमा साजरी केली असे अनोखी राखी पौर्णिमा पांडुरंग परिवारात साजरी करण्यात आली त्यामुळे बाचोटी गावातील विठ्ठल बालाजी पाडोरणे यांच्या घरी मुलगी नसल्यामुळे घडले आहे त्यामुळे सर्वत्र मुलगी म्हणजे दोन्ही घरचा मान उचावणारे असल्याचे खरे बोल ठरले आहे. पण दत्ता विठ्ठल पाडोरणे यांनी देखील मुलगा असून मुलीचे नाते वडिलांसोबत निभावले आहे. दत्ता या मुलाने आपल्या वडिलांना मुलगी नसल्यामुळे आम्ही दोघे भाऊ आहोत त्यामुळे मी माझ्या वडिलांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन बंधन साजरे केले असल्याने कंधार तालुक्यात विशेष चर्चा होत आहे त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी त्यामुळे दत्ता यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करून वडिलांना राखी बांधून दत्ता विठ्ठल पाढोरणे यांनी रक्षाबंधन साजरे केले.

COMMENTS