बिलोली प्रतिनिधी जय किसान माध्यमिक विद्यालय कोल्हेबोरगाव येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्र...
बिलोली प्रतिनिधी जय किसान माध्यमिक विद्यालय कोल्हेबोरगाव येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यकाम घेऊन दोन्ही महामानवास अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी शाळेचे मुख्याध्यापक विजय होपळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक साहेबराव पांचाळ, बळीराम हासगुळे व अतुल गोपछडे हे होते.मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले व २०२६-२७ च्या वर्षीचे पहिले पाक्षिक किशोर दर्पण चे प्रकाशन करण्यात आले व संपादक दुर्गा धाडसे हिने संपादकीय मनोगत मांडले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी करण्यात आली. गुणवत्ता विकास योजनेअंतर्गत घेण्यात येत असलेल्या घटक चाचणी परीक्षेत वर्गातून प्रथम व शोध गुणवंतांचा या स्पर्धा परीक्षेत प्रथम आलेल्या मुलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराम हासगुळे यांनी केले तर सुरेख सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी संजीवनी बुद्धलवाड हिने केले व आभार सुभाष आगसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश सुवर्णकार, संतोष पाटील, काशिनाथ लगडे, अशोक होरे, मदेवाड, उत्तरवाड, मुठनवाड यांनी प्रयत्न केले.

COMMENTS