भाविक माहूर गडावर आला होता परिक्रमा यात्रेसाठी
माहूर (प्रतिनीधी)माहूर गडावर दि 27 पासून सुरू झालेल्या नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेसाठी लाखो भावीक माहुर गडावर आले होते गायवळ ता कारंजा लाड जि वाशिम येथील भाविक अनिकेत वाल्मीक तूरक वय 28 वर्षे हे आपली बहीण व गावकऱ्यासोबत क्रूजर गाडीने माहूर गडावर आले होते परिक्रमा यात्रा पूर्ण करून आंघोळ करण्यासाठी मातृतिर्थ कुंडात पोहण्याचे उद्देशाने उडी मारली असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि 28 रोजी सकाळी 8.30 वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
गायवळ तालुका कारंजा येथील अनिकेत तुरक यांची बहीण व गावातील इतर भाविक गाडी भाड्याने करून दरवर्षीप्रमाणे माहूर गडावर दि 27 रोजी सायंकाळी आले होते माहूर शहरातून श्री दत्त शिखर संस्थान सह संपूर्ण परिक्रमा यात्रा पायी पूर्ण करून अनिकेत हा माहूर शहरातिल पार्किंग मध्ये असलेल्या आपल्या गाडी जवळ आला होता तसेच इतर भाविक गडावरून खाली येत होते आंघोळ करण्याचे उद्देशाने अनिकेत याने मातृतीर्थ कुंड गाठून पोहण्याच्या उद्देशाने पाण्यात उडी मारली येथे असलेल्या जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्यातून बाहेर येत असताना त्यांचा दम टिकला नाही त्यामुळे तो काठावरील पायऱ्यापासून दहा फूट अंतरावर बुडाला जिवलक्षक दलाच्या जवानांनी उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो खोल गाळत रुतला गेल्याने जीव रक्षक दलाच्या हाती लागला नाही त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला
सदरील घटना कळल्याने तहसीलदार अभिजीत जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार भोंडवे नगराध्यक्ष फिरोज दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे पो नी देविदास चोपडे नायब तहसीलदार कैलास जेठे तलाठी चंद्रकांत बाबर विश्वस्त संजय काण्णव यांचे सह सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी मातृतीर्थ कुंडाकडे धाव घेतली सकाळ पासून दुपार पर्यंत शोध मोहीम सुरू होती अथक परिश्रमानंतर दुपारी तीन वाजता त्यांचा मृतदेह हाती लागल्याने बाहेर काढून त्यांना ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी नेण्यात आले

COMMENTS