‘माझी लेक, माझा अभिमान!’: चेन्नई येथील एका दिमाखदार कार्यक्रमात सन्मान
‘लेक लाडकी असते, पण जेव्हा ती कर्तृत्वाने बापाचे नाव उज्ज्वल करते, तेव्हा तो आनंद शब्दांत मांडणे कठीण असते.’ गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या लेकीने ’लाईफ कोचिंग’मध्ये गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवून यशाचे नवे शिखर गाठले. हा क्षण तांबेकर-करंदीकर कुटुंबीयांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.
धनंजय तांबेकर यांची कन्या आणि ‘द हिडन पॉवर ऑफ मॅरिड वूमन’या पुस्तकाच्या लेखिका अवनी अथर्व करंदीकर (देवयानी) यांनी चेन्नई येथे ‘लाईफ कोचिंग’मध्ये गुणवत्ता प्रमाणपत्र (मेरिट सर्टिफिकेट) पटकावून यशाचे नवे शिखर गाठले आहे. अवनी करंदीकर यांना हे सन्मानचिन्ह भारतातील अग्रगण्य लाईफ कोच, मोटिव्हशनल स्पीकर आणि ‘लाईफ बाय डिझाईन’च्या संस्थापक पूजा पुनीत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रतिभावान मार्गदर्शकाच्या हस्ते मिळालेला हा बहुमान अवनीच्या जीवनप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करतानाच, इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची तिची जिद्द आज खर्या अर्थाने फळाला आली आहे, असे कौतुक सर्वस्तरातून होत आहे. लेकीच्या या यशाने भारावलेले वडील धनंजय तांबेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ’अवनीची मेहनत, शिस्त आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यश हे अंतिम ध्येय नसून, ती अधिक जबाबदार्या आणि निरंतर शिकण्याची एक सुरुवात आहे.’ अवनीने यापुढील काळातही ज्ञानाच्या जोरावर समाजात एक वेगळी ओळख निर्माण करावी, अशी प्रार्थना करत त्यांनी तिला उत्तम आरोग्य आणि उत्तरोत्तर यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
.png)
COMMENTS