नांदेड: (दि. २९ जुलै २०२६) लोकशाही व्यवस्थेला यशस्वी आणि सक्षम बनविण्यासाठी कार्यक्षम, जबाबदार व दूरदृष्टी असलेले प्रशासक घडणे अत्यंत आवश्यक...
नांदेड: (दि. २९ जुलै २०२६)
लोकशाही व्यवस्थेला यशस्वी आणि सक्षम बनविण्यासाठी कार्यक्षम, जबाबदार व दूरदृष्टी असलेले प्रशासक घडणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला प्रशासक कसा असावा, हे लोकप्रशासन शिकवते. शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे प्रशासन असून, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख दृष्टीकोन यांचा विकास लोकप्रशासनाच्या अभ्यासातून होतो. विद्यार्थी जीवनात घेतलेली मेहनतच भविष्यात अधिकारी म्हणून कार्य करताना उपयोगी पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळात जिद्द, चिकाटी आणि सातत्याने परिश्रम घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. दीपक वाघमारे यांनी केले यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागामार्फत आयोजित सत्रारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी भूषविले आणि प्रा. श्रीकांत केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. मीरा फड यांनी सत्रारंभ कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना, विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
पुढे बोलताना डॉ. दीपक वाघमारे यांनी, लोकप्रशासन विषयामुळे विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध होणाऱ्या विविध करिअर संधींचा सविस्तर ऊहापोह केला. सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे आवश्यक असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, यशवंत महाविद्यालय हे मराठवाड्यातील अग्रगण्य व नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असल्याचे सांगितले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध शैक्षणिक सुविधा, योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन केले तसेच मराठवाड्यातील एकमेव सर्वात मोठे डिजिटल ग्रंथालय हे यशवंत महाविद्यालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेवटी डॉ. आर.पी.गावंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS