नांदेड | प्रतिनिधी नादेड जिल्ह्यातील ५७ हजारांहून अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत . ७८.५१ कोटींचे दावे प्रलंबित, पिक विम्याची रक्कम...
नांदेड | प्रतिनिधी नादेड जिल्ह्यातील ५७ हजारांहून अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत . ७८.५१ कोटींचे दावे प्रलंबित, पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा सज्जड इशारा खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी दिला आहपिक विम्याची रक्कम अद्यापही न मिळाल्याने खासदार चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप २०२५ – सोयाबीन उत्पादन आधारित दावा) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकरी आजही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांतील ५७,०६४ शेतकऱ्यांचे७८.५१ कोटींचे पीक विमा दावे अद्याप प्रलंबित असून, विमा वितरणासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा हिस्सा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपया मिळालेला नाही.या गंभीर प्रश्नावर खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य शासन, कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीला जाब विचारला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात मंजूर विम्याची रक्कम तातडीने जमा करावी, अन्यथा हा प्रश्न संसदेसह राज्य शासनाच्या स्तरावरही लावून धरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.अधिकृत अहवालानुसार जिल्ह्यातील ५७,०६४ शेतकऱ्यांनी ४१,०२३.७८ हेक्टर क्षेत्रासाठी विमा अर्ज केला होता. त्यापैकी ७८.८४ कोटींचा दावा मंजूर झाला असला, तरी आजपर्यंत प्रत्यक्षात कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. तब्बल ७८.५१ कोटींचे दावे अद्याप प्रलंबित** असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.जेव्हा पात्र शेतकऱ्यांचे दावे मंजूर झाले आहेत, तेव्हा राज्य शासनाचा हिस्सा देण्यास विलंब का होत आहे? असा सवाल उपस्थित करून खासदार रवींद्र चव्हाण यांनी हजारो शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा नेमका कधी मिळणार? शासनाने या विलंबामागील कारणे स्पष्ट करून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.दरम्यान, खासदार रवींद्र चव्हाण** यांनी शासनाच्या या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता राज्य शासन राज्याचा दावा हिस्सा कधी जमा करते आणि नांदेड जिल्ह्यातील ५७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ७८.५१ कोटींचा पीक विमा कधी जमा होतो*, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि उत्पादन घट यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा मोठा आधार ठरणार होता. मात्र मंजूर दावे असूनही विमा न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना खरीप व आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे, खते आणि शेतीच्या इतर खर्चासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले.

COMMENTS