उदगीर / प्रतिनिधी : उदगीर येथील अश्विनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक, सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ, उदगीर न. प. चे स्वीकृत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. बालाजी बिरादार माळेवाडीकर यांना मुरूम येथील आयोध्या कॉम्पलेक्स, रत्नमाला मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर मुरूम नगर परिषदेचे अध्यक्ष श्री. बापूराव (काका ) पाटील, नळदुर्ग न. प. चे नगराध्यक्ष बसवराजजी धरणे, मुरूमचे उपनगराध्यक्ष रमेशजी चव्हाण, उमरगा पं. स. चे मा. सभापती मदनजी पाटील, सरपंच गोविंदजी पाटील, विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक विठ्ठलराव बदोले, माजी नगराध्यक्ष रशीदजी शेख, मुरूम मार्केट कमिटीचे संचालक सुरेशजी मंगरुळे, माजी नगराध्यक्ष धनराजजी मंगरुळे, मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेशजीं आरदाले, मुंबईचे उद्योजक श्री. अंकितजी सक्करगी या .. मान्यवरांची उपस्थिती होती. बसव प्रतिष्ठान मुरूम ता. उमरगा जि. धाराशिवच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. डॉ. बालाजी बिरादार यांना त्यांच्या सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. बालाजी बिरादार यांनी वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर पुणे येथील रुबी हॉल, वाय. सी. एम. हॉस्पीटल येथे अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर आपली कर्मभूमी असलेल्या उदगीर येथे अश्विनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेत आहेत. त्यांनी टीम - यु चॅरिटेबल संस्था स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले स्वतः सहभाग नोंदवला. अनेक सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले. सहभाग नोंदवला. डायबेटीस तपासणीचे अनेक शिबीरे आयोजित केली. कोरोना काळात स्वतःच्या अश्विनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलला कोरोना सेंटर बनवून रुग्णसेवा केली.त्यांचे स्वतःचे एक यु - ट्यूब चॅनेल असून त्या चॅनेलद्वारे ते मधुमेहविषयी जनजागृती करीत असतात.शहरातील स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्याना उदगीर नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची निवड केली. त्यांच्या कार्याची दखल घेवून अनेकांनी त्यांना सन्मानित केलं. डॉ. बालाजी बिरादार यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होतं आहे.

COMMENTS