नांदेड | प्रतिनिधी "प्रसादामध्ये चव किंवा स्वाद शोधू नये, कारण प्रसाद हा साक्षात भगवानाचे स्वरूप असतो. त्याचा स्वीकार श्रद्धा, प्रेम आण...
नांदेड | प्रतिनिधी
"प्रसादामध्ये चव किंवा स्वाद शोधू नये, कारण प्रसाद हा साक्षात भगवानाचे स्वरूप असतो. त्याचा स्वीकार श्रद्धा, प्रेम आणि भक्तिभावाने करणे हेच खरे धर्माचे लक्षण आहे. सामर्थ्यवानाला दोष नसतो आणि शिवस्वरूप आत्म्यात कोणताही दोष असू शकत नाही. भगवान शिव हे संपूर्ण चराचर सृष्टीचे माता-पिता असून त्यांच्या कृपेनेच जीवमात्रांचे कल्याण होत असते," असे प्रतिपादन कथाकार शिवम शुक्ल यांनी केले.
विष्णुपुरी येथील श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने आयोजित शिवपुराण कथा महोत्सवात चौथ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवपुराणातील विविध कथा, प्रसंग आणि आध्यात्मिक संदेशांचे ओघवत्या वाणीतून निरूपण करत उपस्थित भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि सदाचाराचा मार्ग दाखविला.
शिवम शुक्ल म्हणाले की, मनुष्याने जीवनात अहंकार, लोभ आणि स्वार्थ यांचा त्याग करून ईश्वरभक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. भगवान शिव हे भोळे, करुणामय आणि भक्तवत्सल देव आहेत. जो भक्त निस्वार्थ भावनेने त्यांचे स्मरण करतो, त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात आणि त्याला आत्मिक समाधान प्राप्त होते. प्रसाद हा केवळ अन्न नसून तो ईश्वराचा आशीर्वाद असतो. त्यामुळे प्रसाद ग्रहण करताना त्यामागील भक्तीभाव आणि ईश्वरकृपेची जाणीव ठेवली पाहिजे.
शिवपुराणातील विविध प्रसंगांचे उदाहरण देत त्यांनी धर्म, कर्तव्य, संयम, सेवा आणि संतसंगतीचे महत्त्व स्पष्ट केले. संतांच्या सहवासामुळे मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवपुराण कथा महोत्सवात दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. हर हर महादेवच्या जयघोषात आणि शिवभक्तीच्या सुरेल वातावरणात भाविक कथारसाचा आनंद घेत आहेत.
शिवपुराण कथा महोत्सव २० जूनपर्यंत चालणार असून दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत कथांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून शिवकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा, सरस्वती बोंडारकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे,
काळेश्वर मंदिर, सत्संग सेवा समितीचे धरोजी हंबर्डे, बालाजीराव हंबर्डे, सतीश भेंडेकर, बालाजीराव हंबर्डे,सतीश भेंडेकर,धमने पुजारी आदी उपस्तित होते.

COMMENTS