नांदेड -प्रतिनिधी देवाधिदेव भगवान शिवाच्या भक्तीतून जीवनाचे कल्याण होते, आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे यासाठी शिवजींच्या भक्ती रसात विलीन झाल...
नांदेड -प्रतिनिधी
देवाधिदेव भगवान शिवाच्या भक्तीतून जीवनाचे कल्याण होते, आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे यासाठी शिवजींच्या भक्ती रसात विलीन झाले पाहिजे, असा संदेश शिवमहापुराण कथाकार शिवम शुक्ल यांनी मंगळवारी दिला.
विष्णुपुरी येथील श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथा महोत्सवात तिसऱ्या दिवशी कथाकार शिवम शुक्ल यांनी भगवान शिवाच्या महिम्याचे रसाळ निरूपण केले.
यावेळी ते म्हणाले की, "भगवान शिवासारखा अद्भुत देव दुसरा नाही. ज्या कुटुंबात भजन-कीर्तन आणि ईश्वरभक्ती असते, त्या कुटुंबात कलह आणि वाद निर्माण होत नाहीत. शिवभक्त कपटी नसतात, ते भोळे आणि निष्कपट असतात. भगवान शिवाच्या शरणागतीत जाणाऱ्याचे नेहमीच कल्याण होते. संतसंगतीत लाभच लाभ असतो, हानी कधीच होत नाही."
तसेच महादेवाच्या भक्तीमुळे जीवनात सकारात्मकता, समाधान आणि अध्यात्मिक उन्नती प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले. शिवपुराणातील विविध प्रसंग आणि कथांचा आधार घेत त्यांनी उपस्थित भाविकांना भक्ती, सदाचार आणि मानवतेचा संदेश दिला.
शिवपुराण कथा महोत्सव २० जूनपर्यंत चालणार असून दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत कथांचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून धार्मिक वातावरणात भक्तिमय उत्साहाचे दर्शन घडत आहे.
यावेळी आ प्रतापराव पाटिल चिखलीकर, माजी आमदार मोहनराव हंम्बर्ड , माजी खा भास्करराव पाटील खतगांवकर,
माजी मंत्री डी पी सावंत, डॉ मनोजराज भंडारी,जगन्नाथ चक्रवार,दीपक पावड़े
गंगाबिशन कांकर,हरिकिशन लोहिया आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

COMMENTS