राम दातीर माहूर (प्रतिनीधी) माहूर गडावर सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी लिफ्ट व स्काय वॉक प्रकल्पातील आवश्यक बदलांची कामे पूर्ण झाली असून नवी...
राम दातीर
माहूर (प्रतिनीधी) माहूर गडावर सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी लिफ्ट व स्काय वॉक प्रकल्पातील आवश्यक बदलांची कामे पूर्ण झाली असून नवीन डिझाईनही अंतिम करण्यात आले आहे. आता प्रकल्पाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशा सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेडच्या मुख्य अभियंता रुपा राऊळ-गिरासे यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या.
माहूर येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या लिफ्ट व स्काय वॉक प्रकल्पाच्या प्रगतीचा प्रादेशिक स्तरावरून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आज दि. २ जून रोजी क्षेत्रीय पाहणी दौरा व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीची तसेच कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आली.
मुख्य अभियंता रुपा राऊळ-गिरासे यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र प्रकल्प अधिक विलंब न लावता तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी कार्यकारी अभियंता विशाल चोपडे, उपविभागीय अभियंता भिसे, शाखा अभियंता आकाश राठोड, कनिष्ठ अभियंता पवन हनचाटे तसेच गुरुबक्षानी कंपनीचे अभियंता विडेकर व रिजवान खान उपस्थित होते.
६ जून रोजी नामदार नितीन गडकरी घेणार आढावा
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी येथे येतात. केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचे कुलदैवत असल्याने त्यांनी माहूर गडाच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले आहे.
सध्या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना सुमारे २४० पायऱ्या चढाव्या लागतात. वृद्ध, आजारी आणि दिव्यांग भाविकांसाठी ही चढण मोठी अडचण ठरते. ही समस्या लक्षात घेऊन स्काय वॉक व कॅप्सूल लिफ्ट प्रकल्पाची संकल्पना पुढे आणण्यात आली. या प्रकल्पांतर्गत टेकडीच्या पायथ्यापासून थेट मंदिरापर्यंत चार अत्याधुनिक कॅप्सूल लिफ्ट उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि कमी वेळेत दर्शन घेणे शक्य होणार आहे.
सुमारे ५१ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला विविध टप्प्यांवर प्रशासकीय मंजुरी मिळालेली असली तरी मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे काम रखडले आहे. प्रकल्पाच्या कामाचा वेग अत्यंत मंद असल्याची नाराजीही सातत्याने व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दि. ६ जून रोजी नागपूर येथे नामदार Nitin Gadkari संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

COMMENTS