माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, ना. हेमंत पाटील, डी.पी. सावंत , आ. बोंढारकर, अमरनाथ राजुरकर आदी मान्यवरांची उपस्थिती नांदेड : जनसामा...
माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, ना. हेमंत पाटील, डी.पी. सावंत , आ. बोंढारकर, अमरनाथ राजुरकर आदी मान्यवरांची उपस्थिती
नांदेड : जनसामान्यांच्या सुख-दुःखात कायम सहभागी होणारे, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदारसंघात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आमदार कल्याणकर यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला.
मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे आणि जनतेशी कायम जिव्हाळ्याचे नाते जपणारे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्याविषयी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना निरोगी, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी दूरध्वनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण केल्या.
गोविंद गुरु महाराज, ऋषिकेश गुरु महाराज, मा. खा.अशोकरावजी चव्हाण साहेब, आ.हेमंत पाटिल, माजी मंत्री डी.पी सावंत, मा.आ. अमरनाथ राजूरकर, आशाताई शामसुंदर शिंदे,किशोर स्वामी,ॲड.विजय देशमुख, ॲड.माधवराव पावडे, संदीपसिंग गाडीवाले, योगेश मुंडे,आशुतोष राजुरकर,शिवराज कदम ,दर्शनसिंह सिद्धू बुरार, संतोष भारसावडे, गंगाधरराव बडूरे, नारायणराव कदम, गणेश पाटील शिंदे, अपर्णाताई नेरलकर, सुशील चव्हाण, प्रफुल्ल सावंत,राजेश चव्हाण, मुकुंद जवळगावकर,राजु गुंडावार, श्रद्धा चव्हाण,श्याम कोकाटे पाटिल, उमेश दिघे, संतोष मादनवाड, दुष्यंत सोनाळे,सुनील भालेराव, विकास देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.तर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन श्रीमती सीता भाभी, पंडित संजय जोशी, डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते धनंजय जोशी, गोविंद नांदेडे,सुभद्राबाई कल्याणकर, बालाजी कल्याणकर, सौ. संध्या कल्याणकर, जयंत वाकोडकर, गंगाधर बडूरे,नारायण कदम, अपर्णा नेरलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची संगीत संध्या हा सोहळ्याचा विशेष आकर्षणबिंदू ठरला. राहुल देशपांडे यांच्या सुमधुर आवाजाने आणि दर्जेदार सादरीकरणाने उपस्थित रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. अभंग, भावगीते, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताच्या सुरावटींनी संपूर्ण वातावरण भारावून गेले.
संगीताच्या प्रत्येक सुराला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. कार्यक्रमस्थळी उपस्थित हजारो नागरिकांनी या अविस्मरणीय मैफलीचा मनमुराद आनंद घेतला. वाढदिवसाच्या निमित्ताने संगीत, संस्कृती आणि जनसंपर्क यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा सोहळा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न राहता जनतेच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव ठरला.

आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित संगीत संध्यामध्ये राहुल देशपांडे यांच्या गायनाने रसीक झाले चिंब या शास्त्रीय गायनाच्या वेळी राहुल देशपांडे यांनी सुरूवातीला ‘तुज मागतो मी आता, मज द्यावे एकदंता’ या श्रीगणेश वंदनेने सुरूवात झाली. तसेच ‘बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात’ हे गीत त्यांनी सादर केले. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांनी ‘ऐ हसीन वादीया’ हे गाणे सादर करण्याची मागणी केली. त्यांच्या आग्रहाखातर हे गाणे सादर करण्यात आले हे विशेष. कार्यक्रमाची सांगता ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याने करण्यात आली भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

COMMENTS