कंधारचे माजी आ. ईश्वरराव भोसीकरांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा उत्साहात साजरा..

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने वेधले लक्ष.. कंधार  कंधार विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक मा.आमदार ईश्वरराव भोसीकर और उनकी ...
विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने वेधले लक्ष..

कंधार  कंधार विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक मा.आमदार ईश्वरराव भोसीकर और उनकी धर्मपत्नी सौ. सरस्वती भोसीकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा रविवारी, दि.३ मे को सरस्वती नर्सिंग इन्स्टिट्यूट, पानभोसी ता. कंधार येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावून माजी आमदार ईश्वरराव भोसीकर व सौ. सरस्वती भोसीकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या सोहळ्याची तालुकाभर चर्चा रंगली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूरचे सहअध्यक्ष, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सहकारमंत्री ना.मा.बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री डी.पी. सावंत, कंधार विधानसभा क्षेत्र के विधायक आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, विधान परिषद आमदार विक्रम काळे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, ज्येष्ठ पत्रकार तथा अभंग प्रकाशनचे सर्वेसर्वा संजीव कुलकर्णी, पत्रकार संतोष पांडागळे, रामदास पाटील सुमठणकर, कंधार पं.स.चे माजी सभापती बालाजी पांडागळे, कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते..
यावेळी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर व सौ. सरस्वती भोसीकर यांच्या आयुष्यातील पवित्र अशी स्मरणिका ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांच्या अभंग पुस्तकालयमार्फत तयार करण्यात आली होती. या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित ईश्वर सरस्वती : जनसेवेचा सहस्रचंद्र हा माहितीपट या दाखवण्यात आला. माहितीपटामध्ये कंधार परिसराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या ईश्वरराव भोसीकर यांच्या बहुआयामी कार्याचा प्रभावी वेध घेण्यात आला. त्यांच्या बालपणापासून ते अधिवक्ते, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक म्हणून केलेल्या कार्याची समग्र मांडणी करण्यात आली.
राजकीय नेत्यांची मांदियाळ..
यावेळी सौ. सुलोचना देशमुख, राजेंद्र भोसीकर, सौ. मंगल पाटील, संजय भोसीकर, डॉ. निळकंट भोसीकर, खरेदी विक्री संघाचे सभापती किशनराव डफडे, माजी पं.स. उपसभापती संभाजीराव केंद्रे, माजी पं.स.सदस्य डॉ. सुनिल धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर भोसीकर, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी विश्वाभर मंगनाळे, भाजपा कंधार शहर मंडळाचे अध्यक्ष एड. गंगाप्रसाद यन्नावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ. बाळासाहेब पवार, जफर खान, राजकुमार केकाटे, आसेफ शेख, महेश पिनाटे, सुहास कांबळे, चेतन केंद्रे, समीर चाऊस, निलेश गौर, मधुकर डांगे, कैलास कांबळे, शेख हब्बूभाई आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group