यशवंत ' भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्रामद्वारे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम गोल्ड पारितोषिकाने सन्मानित

  नांदेड:(दि. १२ मे २०२६)यशवंत महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्राम: भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२६ अंतर्गत पर्य...

 

नांदेड:(दि. १२ मे २०२६)यशवंत महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील भारत एन्व्हॉर्मेंट प्रोग्राम: भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२६ अंतर्गत पर्यावरण संवर्धन, झिरो प्लास्टिक, ग्रीन कॅम्पस मिशनमध्ये माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार एकूण आठ उपक्रमात रिसर्च हाइट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने १६८ विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण आणि यशस्वी कृतिशील उपक्रमांनी सहभाग नोंदविला होता. या उपक्रमात भारतातील जवळपास प्रत्येक घटक राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता. 

               विविध उपक्रम प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, हरित कॅम्पस हे केवळ शिक्षणाचे स्थान नसून ज्ञान आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचे जिवंत उदाहरण असल्याचे ध्येय केंद्रबिंदू मानून डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव यांच्या समन्वयाद्वारे संपन्न झाले. यामध्ये यशवंत महाविद्यालय ते भाग्यनगर समुदाय जनजागरण रॅली आणि भाग्यनगर परिसरात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. बाबानगर परिसरात झिरो प्लास्टिक ड्राईव्ह अंतर्गत शासकीय रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कॅम्पस ग्रीन ॲक्शनअंतर्गत बोटॅनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपणाबरोबरच कचरा व्यवस्थापन आणि जल पुनर्वापरावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पोस्टर सादरीकरण, महाविद्यालयाचे ग्रीन ऑडिट, सस्टेनेबल आयडिया अँड सोल्युशन सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना नोंदविण्यात आल्या.

                 या राष्ट्रीय स्तरावरील कृतिशील व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल यशवंत महाविद्यालयास प्लॅटिनम गोल्ड सस्टेनेबल कॅम्पस पारितोषिकाने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले आहे. दि.१ जून २०२६ रोजी ग्लोबल पीस ऑडिटोरियम, हैदराबाद येथे या गौरवशाली पारितोषिकाचे वितरण संपन्न होणार आहे. त्याकरिता महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य, चार प्राध्यापक आणि दहा विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलेले आहे.

                'यशवंत ' च्या शिरपेचात राष्ट्रस्तरीय पारितोषिकाचा मानाने तुरा खोवल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. खा. श्री.अशोकरावजी चव्हाण, उपाध्यक्ष माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री श्री.डी.पी.सावंत, सहसचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अँड. उदयराव निंबाळकर, कार्यकारणी सदस्य अँड.आ.कु. श्रीजयाताई चव्हाण, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. नरेंद्र चव्हाण, श्री. पांडुरंगराव पावडे यांनी अभिनंदन केले आहे.

               उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ.रमेश चिल्लावार, डॉ. संतोष राऊत, डॉ.बी.बालाजीराव, डॉ. एम.एम.व्ही.बेग, डॉ.मदन अंभोरे, प्रा. प्रियंका सिसोदिया, लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर, प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ.कांचन गायकवाड यांनी परिश्रम घेतले तसेच डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.योगेश नकाते, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group