अनेक प्रकरणांचा निपटारा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. कंधार दि.१२ मे २०२६ कंधार येथील न्यायालयात ९ मे २०२६ रोज शनिवार राष्ट्रीय लोकअद...
अनेक प्रकरणांचा निपटारा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
कंधार दि.१२ मे २०२६
कंधार येथील न्यायालयात ९ मे २०२६ रोज शनिवार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित लोक अदालतीस सकाळी ११:०० वाजता प्रारंभकरण्यात आला. यावेळी पक्षकारांकडून सदरच्या लोक आदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात विविध प्रकारची जवळपास २९ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.यात प्रामुख्याने मोटार अपघात, भूसंपादन तसेच इतर दिवाणी स्वरूपाच्या एकूण २९ प्रकरणांमध्ये संमतीने तडजोड घडवून आणण्यात आली. या माध्यमातून तब्बल २ कोटी ४ लाख ६१ हजार ६७२ रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे पक्षकारांचा वेळ व खचार्ची बचत होऊन अनेकांना दिलासा मिळाला. जिल्हा न्यायालयाचे पॅनल प्रमुख म्हणून तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ वी. व्ही. चौधरी तसेच सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर के. एस. खंडारे यांनी सामंजस्याने प्रकरणे निकाली काढली.
पॅनेलवर ॲड. एच. आर. घडीवाला व ॲड. एस. एस. कांबळे यांनी सहकार्य केले. तसेच सहायक अधीक्षक आर. के. गवळी, वरिष्ठ लिपीक जितेंद्र सिंदगीकर, पी. पी. चव्हाण, एस. एन. मुंडे, जे. एच.बनसोडे, बी. आर. कांबळे व एम. एस. नाईक यांनीही परिश्रम घेतले.
यावेळी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. बी. के. पांचाळ, डी. पी. गायकवाड, ॲड. अनिल डांगे, ॲड. बाबू पाटील, सुहास मस्के, श्रेयस धमापुरीकर, ॲड. दिव्या कुलकर्णी यांच्यासह अनेक वकील मंडळी उपस्थित होती.

COMMENTS