नांदेड: जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी राबवलेल्या 'मिशन निर्भया' अंतर्गत मरखेल पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. देगलूर तालु...
नांदेड: जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी राबवलेल्या 'मिशन निर्भया' अंतर्गत मरखेल पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. देगलूर तालुक्यातील कुन्मारपल्ली येथून पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते. मरखेल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास पवार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.
सायबर सेल नांदेडच्या तांत्रिक मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे, सदर मुलगी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने तातडीने हैदराबाद गाठून जनता नगर, मोसापेठ भागातून पीडित मुलगी आणि आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला अटक
याप्रकरणी शिवकुमार उर्फ दावीद बसवंत वाघमारे (वय २४ वर्ष, रा. कुन्मारपल्ली, ता. देगलूर) याला अटक करण्यात आली आहे. मरखेल पोलिसांनी पीडितेची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सपोनि रवी हुंडेकर, पीएसआय विलास पवार, महिला पोलीस कर्मचारी तेलंग, पोलीस कर्मचारी नारायण यंगाले, बोदेमवाड आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
नेमकी घटना काय?
देगलूर तालुक्यातील एका फिर्यादीची अल्पवयीन मुलगी १६ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तक्रार मरखेल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी कलम १३७ (२) BNS नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
असा लागला शोधगुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते. मरखेल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास पवार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

COMMENTS