नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रामार्फत आगामी शैक्षणिक वर्षापासून “पोस्ट ग्रॅज्युएट डि...
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रामार्फत आगामी शैक्षणिक वर्षापासून “पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेव्हलपमेंट स्टडीज” हा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य डॉ. महेश मगर यांनी मागील अधिसभा बैठकीत “Rural Development” अथवा “Development Studies” या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. मराठवाड्यातील ग्रामीण, सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते. अधिसभेमध्ये यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रामार्फत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून अभ्यासक्रमाची रूपरेषा, अभ्यासक्रम संरचना तसेच प्रवेश प्रक्रियेची नियमावली अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी तयार केली आहे. अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) अनुषंगाने तयार करण्यात आला असून ग्रामीण विकास, विकास अध्ययन, सार्वजनिक धोरण, कृषी व सामाजिक-आर्थिक प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्था आणि क्षेत्रीय अभ्यास यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा असून दोन सत्रांमध्ये विभागलेला आहे. क्षेत्रभेटी, प्रात्यक्षिके, अहवाल लेखन, सादरीकरण आणि संशोधनाभिमुख अध्ययनावर विशेष भर देण्यात येणार अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे.
हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा असून दोन सत्रांमध्ये विभागलेला आहे. क्षेत्रभेटी, प्रात्यक्षिके, अहवाल लेखन, सादरीकरण आणि संशोधनाभिमुख अध्ययनावर विशेष भर देण्यात येणार अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS