नांदेड (प्रतिनिधी) नांदेड तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडा येथील गट क्रमांक ६८ मध्ये शासनाकडून जाफर शहा बाबा शहा ह्याने दि, ०९ ते २१/०५/२०२६ पर...
नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडा येथील गट क्रमांक ६८ मध्ये शासनाकडून जाफर शहा बाबा शहा ह्याने दि, ०९ ते २१/०५/२०२६ पर्यंत फक्त १०० ब्रास गौण खनिज माती उत्खननाची परवानगी असताना त्यांनी अत्याधुनिक यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्याने त्याचा विरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्या बाबत निवेदन देऊनही काहीच उपयोग झालेला नाही असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तहसीलदार व सबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की नांदेड तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडा येथील शेत मालक माधवराव नागोराव मोरे यांच्या जमिन गट क्रमांक ६८ मधून शासनाकडून केवळ १०० ब्रास गौण खनिज माती उत्खननाची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु प्रत्यक्षात सदर ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामग्री जे.सी.बी. व इतर वाहनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असून दिवसाला अंदाजे १००० ब्रास मातीचे उत्खनन करण्यात येत आहे.सदर अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुली तोटा होत असून परिसरातील पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांना ध्वनी व धूळ प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दिलेल्या परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने उत्खनन सुरू असल्याने यांना पाठबळ देणारे तलाठी ,मंडळ अधिकारी व संबंधितांवर कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध उत्खनन बंद करावे तसेच संबंधित व्यक्तींवर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असेही शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे,

COMMENTS