स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६’चा उत्साहात समारोप झाला. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया (PEFI) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच क्रीडा कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला. शिबिरात ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आणि हॉकी यांसारख्या मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, एरोबिक्स, बॉक्सिंग, योगा, वेटलिफ्टिंग आणि फिजिकल फिटनेस यांचेही प्रशिक्षण सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आले.
शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य क्रीडांगणे आणि आधुनिक इनडोअर स्टेडियमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी प्रशिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. तसेच सहभागींसाठी मोफत बस सेवा आणि टी-शर्टची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.
५ ते १८ वर्षे वयोगटातील एकूण ७० मुले व मुलींनी या शिबिरात सहभाग घेतला. उन्हाळी सुटीचा सदुपयोग करत मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.
यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून खेळ, व्यायाम आणि योगाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. निरोगी शरीरासाठी नियमित खेळणे आणि योगाभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोप कार्यक्रमास क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, नॅक सेलचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. चैतन्य, डॉ. कुलजीत राणा आणि डॉ. पारस यादव उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय जाधव, पूनम यादव, संजयसिंह ठाकूर, शिवाजी हंबर्डे, सुनील लुटे, परमजोतसिंग सिद्धू आणि रतनसिंग पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpg)
COMMENTS