नांदेड | प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व...
नांदेड | प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने उद्या दि. १७ मे (रविवार) रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता शासकीय विश्राम गृह, नांदेड येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.लोककल्याणकारी व न्यायप्रिय राज्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविणे तसेच जयंती उत्सव भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या बैठकीस सर्व समाजबांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते व तसेच जास्तीत जास्त अहिल्याप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोविंद गोरे, पंढरी जायनूरे, प्रदीप सरोदे, भास्कर तळणे, नवनाथ काकडे, दीपक तुडमे, विठ्ठल काळे, शिवकुमार देवकते, गजानन सरोदे, प्रेम देवदे, श्रीहरी मुंडकर आदींनी केले आहे.

COMMENTS