मुंबई : मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी गेल्याने मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूम...
मुंबई : मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी गेल्याने मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त अपना बाजार को-ऑप. आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून तब्बल २८७ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. दादर (पूर्व) येथील अपना बाजारच्या मुख्य कार्यालयात १७ मे २०२६ रोजी आयोजित केलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतसामाजिक बांधिलकी जपली. यावर्षी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये रक्तसाठा चिंताजनक पातळीवर
असताना, या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या शिबिरासाठी तरुण मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या शिबिरात नागरिकांनी उत्साहाने रक्तदान करत “रक्तदान हेच श्रेष्ठदान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. अपना बाजार चे अध्यक्ष श्री. अनिल गंगर यांनी सांगितले की, “मुंबईत रक्ताचा तुटवडा असताना समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला. एका रक्तदानातून तीन जीव वाचू शकतात, ही जाणीव समाजात अधिक दृढ व्हावी हा यामागील उद्देश आहे.” वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. नितीन दळवी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. स्थानिक आमदार मा. कालिदास कोळंबकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेविका माधुरीताई मांजरेकर आदी मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व रक्तदाते, कर्मचारी, स्वयंसेवक आणि आयोजन समितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. समाजहितासाठी यापुढेही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. जगदीश नलावडे यांनी सांगितले.

.jpeg)

COMMENTS