सेलू : (प्रतिनिधी) नूतन विद्यालय, सेलू येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश सं...
सेलू : (प्रतिनिधी) नूतन विद्यालय, सेलू येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत कु. मुक्ता यादवराव घोडके हिने ९३.८० टक्के, कु. सृष्टी कैलासराव सोळंके हिने ९३.२० टक्के, तर ज्ञानराज जयंत बावणे याने ८९.४० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.नूतन विद्यालयातील तब्बल २१ खेळाडूंनी राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी होत एसएससी परीक्षेत गुणवाढीचा लाभ घेत उल्लेखनीय यश मिळविले. यामध्ये घोडके मुक्ता यादवराव, गायके गायत्री दत्ता, ताठे सई रावसाहेब, चव्हाण प्रतीज्ञा विजय, शिंदे अंकिता दत्ता, अर्जुने साक्षी प्रभाकर, गोरे कार्तिकी संजय, मोरे श्रेयाशी धोंडीराम, मैड कृष्णा रमेश, सोळंके विश्वजीत पांडुरंग, मुंढे प्रतीक संजय, बावणे ज्ञानराज जयंत, बोकन सार्थक धोंडीराम, वाघ अभय हनुमान, घोडके श्रावणी प्रकाश, घोडके भाग्यश्री गंगाधर, सोळंके सृष्टी कैलासराव, क्षीरसागर कृष्णा राजकुमार, गात गोविंद गणेश, राऊत समर्थ सुरेश व धापसे अनंत अविनाश या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.“मैदानावर खेळल्याने शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढून बौद्धिक विकास होतो. राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धेत सहभागी होत नियमित अभ्यास केल्यामुळेच मला ९३.८० टक्के गुण मिळविता आले,” असे मत कु. मुक्ता घोडके हिने व्यक्त केले.तसेच कु. सृष्टी कैलासराव सोळंके हिने सांगितले की, “इयत्ता सहावीपासून मी नियमित योगाभ्यास करत आहे. योगामुळे मनाची एकाग्रता वाढली आणि त्यामुळेच मला दहावीच्या परीक्षेत ९३.२० टक्के गुण मिळविता आले. या यशामागे गुरुजनांचे मार्गदर्शन, माझी मेहनत व जिद्द कारणीभूत ठरली.” तिला योगाचे प्रशिक्षण डी. डी. सोन्नेकर सर यांनी नूतन विद्यालयाच्या योगा हॉलमध्ये दिले. दररोज सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत नियमित योगाभ्यास घेतला जात असल्याचेही तिने सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया, सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सितारामजी मंत्री, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, गणेश माळवे, क्रीडा विभाग प्रमुख प्रशांत नाईक, संजय भुमकर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS