नांदेड: सोने-चांदी, पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाच्या वापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या एका आवाहनाचा सर्वत्र निषेध होत आ...
नांदेड: सोने-चांदी, पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाच्या वापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या एका आवाहनाचा सर्वत्र निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर, नांदेडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील वजीराबाद आणि हनुमान पेठ परिसरात शिवसैनिकांनी नागरिकांना 'झालमुरी' वाटून केंद्र सरकारचा निषेध केला.
झालमुरी खा, देश वाचवा'चा नारा शिवसेना महानगरप्रमुख मनोज जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले [
"झालमुरी खा, देश वाचवा" अशा घोषणा देत शिवसैनिकांनी नांदेडकरांचे लक्ष वेधले. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने-चांदी खरेदी न करण्याचे आणि तेलाचा वापर जपून करण्याचे आवाहन केल्याचा दावा करत, शिवसैनिकांनी यावर कडाडून टीका केली. "जनतेने काय खावे आणि काय खरेदी करावे, यावरही आता सरकार निर्बंध घालणार का?" असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला
व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आंदोलनादरम्यान मनोज जाधव म्हणाले की, "निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान स्थिरतेचे आश्वासन देतात, मात्र आता सोन्या-चांदीच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे [. जर जागतिक घडामोडींमुळे किमती वाढत असतील, तर पंतप्रधानांनी जनतेला थेट खरेदी थांबवण्याचे आवाहन करणे चुकीचे आहे."
"अच्छे दिन" ऐवजी "झालमुरी"चे दिवस आंदोलकांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवण्याऐवजी जनतेला उपदेश देणे सुरू केले आहे. "अच्छे दिन" येतील असे सांगितले होते, मात्र आता सर्वसामान्यांवर झालमुरी खाऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे [
जर हीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात मोठ्या व्यावसायिकांनाही आपली दुकाने बंद करून रत्यावर झालमुरी विकावी लागेल, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS