वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ' तातडीने कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कामगार मंत्री यांना नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने निवेदन...

नांदेड:"घोषणा झाली, आता अंमलबजावणी करा!" या प्रमुख मागणीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या निर्देशानुसार ...

नांदेड:"घोषणा झाली, आता अंमलबजावणी करा!" या प्रमुख मागणीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री व कामगार मंत्री यांना तालुका व जिल्हा स्तरावर निवेदने देवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू आहे. याचाच भाग म्हणून आज नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने ऊन-पावसाची तमा न बाळगता घराघरांत ज्ञान पोहोचवणाऱ्या या कष्टकरी बांधवांसाठी सरकारने जाहीर केलेले 'वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ' अद्याप कागदावरच असल्याने, ते तातडीने कार्यान्वित करावे या मागणीचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना देण्यात आले.महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन सादर करण्यात आले.या आंदोलनात आणि निवेदन देताना महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार, दिपक तिडके यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेता सदस्य उपस्थित होते.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. "वृत्तपत्र विक्रेत्यांच्या भावना आणि हे निवेदन मी तातडीने आजच शासन स्तरावर पाठवून पाठपुरावा करतो," असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले. निवेदनात सरकारने घोषित केलेले वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ तात्काळ कार्यान्वित करून त्याचा 'जीआर' (GR) काढावा. असंघटित क्षेत्रातील या विक्रेत्यांना पेन्शन आणि विमा संरक्षण लागू करावे. विक्रेत्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सवलती जाहीर कराव्यात. अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी आता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्याचे राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आज राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी पत्र पाठवून याच मे महिन्यात एक तातडीची संयुक्त बैठक बोलवावी असे पत्रही पाठवले आहे. या विषयाकडे गांभीर्याने लक्ष नाही दिल्यास लवकरच पुढील आंदोलनात्मक दिशा ठरविण्यात येईल असे राज्य कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी सांगितले. 


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group