नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी टेबल टेनिस क्रीडा प्रशिक्षण शिबीर...
नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी टेबल टेनिस क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक 21 मे 2026 ते 10 जून 2026 दरम्यान वेळ सांयकाळ सत्रात 4.30 ते 7.30 या कालावधीत विद्यार्थी खेळाडूंसाठी टेबल टेनिस क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेया शिबीरामध्ये अनुभवी प्रशिक्षकांकडून टेबल टेनिस खेळांचे मूलभूत तंत्र, फिटनेस प्रशिचण, सराव सामने तसेच स्पर्धात्मक मार्गदर्शन खेळाच्या नियमातील बदल, सद्यस्थीत खेळाचे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अद्यावत स्थितीबाबत अद्यावत ज्ञान, प्रात्याक्षिक, यांच्याद्वारे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरात नांदेड जिल्हयातील जास्तीत-जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष श्री.नरेंद्र चव्हाण व नांदेड जिल्हा जिल्हा टेबल टेनिस संघटेनेचे सचिव डॉ.अश्विन बोरीकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क श्री.हानमंत नरवाडे ,मो.9604866253 श्री. आनंद नरवाडे -7744820011

COMMENTS