नांदेड: नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या मालकीच्या सर्व्हे नं. २४ मधील अनारक्षित मोकळ्या जागेत पेट्रोल पंपासाठी जागा देण्याची कार्यवाह...
नांदेड: नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या मालकीच्या सर्व्हे नं. २४ मधील अनारक्षित मोकळ्या जागेत पेट्रोल पंपासाठी जागा देण्याची कार्यवाही नियमानुसार करावी, असे निर्देश नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या अधीक्षकांना दिले आहेत. उप जिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे आदेश जारी केले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नांदेड येथील सर्व्हे नं. २४, न.भू.क्रं. ११७५८ मधील १०० x ७५ क्षेत्रफळाचा एक प्लॉट पेट्रोल पंपासाठी १८ ते २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याबाबत मंजुरी देण्यात आली होती. गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब अॅक्ट १९५६ आणि अंतर्गत नियम १९५८ नुसार स. हरनाम सिंघ फत्तेसिंघ मल्होत्रा यांना हा पेट्रोल पंप भाडेपट्ट्याने मंजूर करण्यात आला होता
स्थानिक भाविकांचा विरोध आणि जागेचे आरक्षण
दरम्यान, गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या ज्या मोकळ्या जागेवर हा पेट्रोल पंप नियोजित होता, त्या जागेवर नांदेड महानगरपालिकेचे ‘गार्डन’ (बगीचा) साठीचे आरक्षण होते. तसेच या जागेवर पेट्रोल पंप उभारण्यास स्थानिक संगत आणि भाविकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे पूर्वी मंजूर केलेल्या जागेवर प्रत्यक्षात जागा वाटप करण्यात आले नव्हते.
पर्यायी अनारक्षित जागेत होणार कार्यवाही
या सर्व पार्श्वभूमीवर, स. हरनामसिंघ मल्होत्रा यांनी त्याच सर्व्हे क्रमांकामधील गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या दुसऱ्या, म्हणजेच कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसलेल्या (अनारक्षित) मोकळ्या जागेत पेट्रोल पंपासाठी मागणी केली आहे.यापूर्वीच शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार या पेट्रोल पंपासाठी मंजुरी देण्यात आलेली असल्याने, जिल्हाधिकारी कार्यालयाने स. हरनामसिंघ मल्होत्रा यांच्या विनंतीचा विचार करून त्यांना त्याच सर्व्हे नंबरमधील इतर अनारक्षित जागेत पेट्रोल पंपाकरिता जागा देण्याची पुढील कार्यवाही आपल्या स्तरावरून नियमानुसार करावी, असे पत्र गुरुद्वारा बोर्डाला पाठवले आहे

COMMENTS