परभणी लेक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया व हिमाचल प्रदेश लेक्रॉस असोसिएशन वतीने 3री राष्ट्रीय लेक्रॉस क्रीडा स्पर्धा सुंदर नगर हिमाचल प्रदेश येथे दि. ९ ते १२ मे दरम्यान संपन्न झाल्या या स्पर्धेत सिनियर महाराष्ट्र राज्य संघाने पॉडीचॅरी संघास (१२ :०)१२ गोल ने पराभूत केले तर जम्मू काश्मीर संघास ६ गोल ने, गोवा संघा सोबत (७:४) गोल ने पराभूत केले. उपांत्य फेरीत राजस्थान वि महाराष्ट्र दरम्यान ३१:०४ गोल ने महाराष्ट्र संघ पराभूत होऊन .
कांस्यपदक लढतीसाठी महाराष्ट्र वि छत्तीसगड दरम्यान ६:२ गोल ने महाराष्ट्र राज्य संघास कांस्यपदक पटकावले.महाराष्ट्र राज्य सिनियर लेक्रॉस संघास विजया साठी अजय चव्हाण ०७, व गुणीश बेदी ०४ गोल करून कांस्यपदक पटकावले.संघातील खेळाडू: ऋषिकेश बामणीकर , अजय चव्हाण,शंभुराजे मोहिते ,विनय मोहित , कुणाल चव्हाण ,अनुराग अंबाटी ,गुणीश बेदी , स्वास्तिक गिरी ,चेतन सोनवणे, सागर बोरडे, खेमचंद पाटील ,भूषण शिंदे यांचा समावेश होतो संघास मार्गदर्शन प्रतिक टवके तर संघ व्यवस्थापक अब्दुल जबाक यांनी काम पाहिले.या उज्वल यशाबद्दल राज्य अध्यक्षा डॉ सुमेधा ठाकुर, सरचिटणीस डॉ. मोहम्मद बाबर, प्रशांत नाईक, गणेश माळवे, संतोष कठाळे, रामदास गिरी यांनी अभिनंदन केले. यांचे लाभले.या उज्वल यशाबद्दल राज्य अध्यक्षा डॉ सुमेधा ठाकुर, सरचिटणीस डॉ. मोहम्मद बाबर, प्रशांत नाईक, गणेश माळवे, संतोष कठाळे, रामदास गिरी यांनी अभिनंदन केले.

COMMENTS