नांदेड (प्रतिनिधी) : गीता परिवार नांदेड द्वारा आयोजित पाच दिवसीय बाल संस्कार शिबिर श्रीराम मंदिर चिखलवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या ...
नांदेड (प्रतिनिधी) : गीता परिवार नांदेड द्वारा आयोजित पाच दिवसीय बाल संस्कार शिबिर श्रीराम मंदिर चिखलवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या बाल संस्कार शिबिरात साठ विद्यार्थी ,विद्यार्थ्यांनीनी भाग घेतला. शिबिरामध्ये गीता परिवाराची पंचसूत्री, भगवद्गीता ,भगवत प्रेम भारत माता,विज्ञान निष्ठा व स्वामी विवेकानंदयाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिनचर्या , प्रज्ञा संवर्धन, देशभक्ती पर गीत, गीतेचा 15 वा अध्याय,कथा कथन ,सूर्य नमस्कार, योगा, हास्य-योग ,शरीर निरोगी कसे ठेवावे याबद्दल विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. मैदानी खेळ क्राफ्ट, सलाद डेकोरेशन , कथाकथन ,नाटय लेखन, रामायण नाटिका सादर करण्यात आली. नाटिकेत रामायण झांकी, सीता स्वयंवर, कैकयी वचन, सीता हरण ,रावण वध, भरत भेट,हनुमान मिलन, अशोक वाटिका, मेघनाथ लक्ष्मण युद्ध, राम रावण युद्ध, बिभीषण राजाभिषेक, राम दरबार इत्यादी प्रसंग दर्शविण्यात आले.
बाल संस्कार शिबिराची सांगता मोठ्या उत्साहात झाली. मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता सर्वश्री डॉ यशवंत चव्हाण, राम तरटे, अंबरीश तिवारी, सारिका बंग,किरण मंत्री ,डॉ उर्मिला मालू, योगाभ्यासीका ज्योति काबरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रेखा शर्मा, दीप्ती हेडा,प्रभा निरणे, ज्योती काबरा ,उर्मिला व्यास, डॉ बास्टेवाड,चंचल वर्मा,नारायण मामडी , गोपाल बंग, गंगाबिशन कांकर , एड.चिरंजीलाल दागडिया, सुरेश मंत्री, एड. बी एच निरणे यांनी परिश्रम घेतले. शिबिरार्थी विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र व बक्षीस देण्यात आले.

COMMENTS