अर्धापूर/ नांदेड : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नवसाला पावणारा आणि ...
अर्धापूर/ नांदेड : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नवसाला पावणारा आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून सत्यगणपतीची ख्याती राज्यभर आहे
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येथे हजेरी लावतात. अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील सत्यगणपती मंदिरात मंगळवारी दि.५ रोजी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सोमवारी मध्यरात्री रात्री १२.२० वाजल्यापासून सत्यगणपती अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणपती बाप्पाची विशेष पूजा बांधण्यात आली. मंदिराला आकर्षक रोषनाईसह विविध रंगीबेरंगी फुलांची आरास घालून सजवण्यात आलं. दर्शनासाठी पुरुष आणि महिला भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातूर मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
.jpeg)
COMMENTS